मागील आठवड्यापासून ओढ दिलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मान्सूनचे दमदार आगमन झाल्यानंतर पाऊस गायब झाला होता. रविवारी सकाळपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. यामुळे शेतातील पिकांना पोषक वातावरण निर्माण करणारा ठरला आहे.
पेरणीनंतर मोठा पाऊस झाला. त्यामुळे पिके कुजून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र पाऊस गायब झाला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
यावर्षी वळीवानेही जोरदार झोडपल्याने पेरणी व मशागतीसाठी हा पाऊस पोषक वातावरण निर्माण करणारा ठरला. रविवारपासून पावसाचा शिडकावा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पाऊस हे शेतकऱ्यांसाठी पीक उगवण्यासाठीचे एक माध्यम आहे. पावसाशिवाय शेतकऱ्यांचे काहीच चालू शकत नाही आणि पाऊस येणे महत्वाचे असते. आता नियमित पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.