अनेक व्यक्तीचे चोरलेले साहित्य शोधण्याचे काम पोलीस करतात पण पोलीसांचीच एखादी वस्तू हरवली तर? त्याला कोण शोधणार ? असा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. मात्र पोलिस मामाची हरवलेली पर्स एका विद्यार्थ्यांने परत करून आपला प्रामाणिकपणा जपला आहे,
खडेबाजार पोलीस स्थानकातील एका पोलीस मामाच्या बाबतीत ही घटना घडली आहे. शनिवारी सकाळी रमजान ईद साठी हे पोलीस मामा आपल्या सेवेवर रुजू होते. सेवेत असतांना काही मित्रांसंवेत बोलत होते. त्यावेळी त्यांच्या खिशातील पाकीट तेथेच पडले.
त्यांना परत दुसरीकडे कामासाठी परत दुसरीकडे जावे लागले.
या पाकीट मध्ये ३० हजार रुपये आणि काही कागदपत्रे होती. काही वेळा नंतर त्या पोलीस हवालदाराला आपले पाकीट पडल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने शोधाशोध घेतली पण ते सापडले नाही.
या रस्त्यावरून कर्तन बागेवाडीचा एक विद्यार्थी जात असताना त्याला हे पाकीट सापडले . त्याने ते पाकीट क्राइम पोलीस स्थानकात दिले. त्यावरील संबंधित पोलीस मामाला ते पाकीट वापस करण्यात आले. त्याच्या प्रामाणिक पणा बद्दल त्याचे कौतुक होत आहे.
Trending Now