वेगात येणाऱ्या दुचाकीने थांबलेल्या ट्रक ला जोराची धडक दिल्याने तिघे जण जागीच ठार झाले आहेत.शुक्रवारी मध्यरात्री साडे बाराच्या दरम्यान खानापूर लोंढा मार्गावर गुंजी जवळ ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करीम मकदुम शेख वय 30,शहानुर सलीम शेख वय 23 दोघेही रा. माडीगुंजी,पुंडलिक मल्लाप्पा कोटनगी वय 28 रा.हलकी सौन्दती अशी अपघातात मयतांची नाव आहेत.
तिघेही मोल मजुरी करत होते ते वापस परतते वेळी हा अपघात घडला आहे. गोव्याहून बेळगाव कडे निघालेल्या ट्रक चा टायर पंक्चर असल्याने रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आला होता. अपघातातील मयत तिघेही गुंजी कडे येत होते अंधारात ट्रक न दिसल्याने दुचाकीने थांबलेल्या ट्रक ला जोराची धडक दिली त्यात हा अपघात झालाय. दुचाकी चा वेग इतका जोरदार होतां की त्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी तिघांनाही खानापूर इस्पितळात दाखल करण्यापूर्वी च त्यांचा मृत्यु झाला.अपघाताची खानापूर पोलिसात नोंद झाली आहे.