शहर आणि तालुक्यातील मराठी सरकारी प्राथमिक मराठी शाळांना मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी युवा समिती आणि श्री राम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर यांनी केली आहे.शुक्रवारी जिल्हा शिक्षणाधिकारी बी ए पुंडलिक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
शहर परिसरात ज्या सरकारी शाळा बंद आहेत किंवा ज्या शाळेत नवीन बेंच व्यवस्था झाल्यानंतर जे लाकडी पाट अडगळीत गेले आहेत ती आसन व्यवस्था धामणे, निलजी आणि इतर प्राथमिक शाळा आहेत जिथे आसन व्यवस्था नाही तिथे पुरविण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पुंडलिक यांनी मराठी शाळांच्या या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच आसन व्यवस्थेसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
युवा समिती म्हणून जेव्हा शाळेत भेटी देत आहोत त्यावेळी अशाही काही शाळा आहेत जिथे विद्यार्थी आहेत तिथे विद्यार्थ्यांना बसायला आसन व्यवस्था नाही, आणि जिथे आसने आहेत तिथे विद्यार्थीच नाहीत अशीच आसन नसलेली शाळा म्हणजे धामणे येथील मराठी पूर्व प्राथमिक शाळा, 1 ली ते 4थी पर्यंत जवळपास 140 विद्यार्थी आहेत पण ते खाली जमिनीवर घरातून आणलेल्या पोत्यावर, गोणपाटावर बसले होते. पावसाचे दिवस आणि खाली थंडगार फरशी, चिमुकल्यांची अवस्था पहिली गेली नाही म्हणून निवेदन दिले गेले अशी माहिती युवा समितीच्या श्रीकांत कदम यांनी बेळगाव live ला दिली .सदर कार्याला रमाकांत दादा कोंडुस्कर यांची मोलाची साथ लाभलीअसेही कदम यांनी नमूद केलं.