वारंवार मराठी कागदपत्रे देण्यास चालढकल करणाऱ्या अध्यक्ष आणि अधिकाऱ्यना तालुका पंचायत सर्वसाधारण बैठकीत मराठी सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. आम्ही भीक मागत नसून आमचा अधिकार मागत आहे.आम्हाला न्यायालयाने दिलेला अधिकार हवा आहे, असे मराठी सदस्यांनी ठणकावून सांगितले.विधान सभा निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी या तालुका पंचायत सर्वसाधारण बैठीचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदार अनेकदा मराठी कागपत्रांची मागणी करून देखील अधिकारी आणि अध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
प्रारंभी सभेच्या सुरुवातीला अध्यक्ष गैर हजर होते. त्यामुळे सुरुवातीलाच मराठीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र अध्यक्ष नसल्यानें उपाध्यक्ष यांनी पदभार स्वीकारला होता. यावेळी उपाध्यक्ष यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बैठकीच्या शेवटी मराठीचा मुद्दा उपस्थित केला गेला.
यावेळी आम्ही मराठीतून कागदपत्रे मागत आहोत जर तुम्हाला माहिती मराठीतून कागदपत्रे द्यायची नाहीत तर तसा ठराव करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यामुळे पुढील बैठकीत हिंदीमधून कागदपत्रे देण्याचे सांगून मराठीबाबत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न यावेळी उपस्थित कन्नड सदस्यांनी केला.यावेळी सुनील अष्टेकर ,अप्पासाहेब कीर्तने,उदय सिद्द्न्नावर ,रावजी पाटील ,नीरा काकतकर,मनीषा पालेकर,लक्ष्मी मैत्री आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागाच्या नवनिर्वाचित आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून बस वरील फलक सात बारा उतारे आणि मराठी कागदपत्रे देण्याचे आश्वासन दिले होते निवडून आल्यावर ते पाळतात का हे पाहावे लागेल.