बेळगावातील किल्ला तलावात देशात सर्वात उंच राष्ट्र ध्वज उभारण्यात आला आहे या उंच ध्वजाची नोंद रिकॉर्ड बुक मध्ये देखील करण्यात आली आहे मात्र या ध्वजाचा देखभाली साठी महा पालिकेतून नव्हे तर आमदार फंडातून निधी केला जाणार आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षा सरला हेरेकर यांनी उंच ध्वजाच्या देखभालीचा फंड महा पालिकेच्या निधीतून देण्यास नकार दिला आहे हा ध्वज खास १०० कोटी अनुदानातून बसवण्यात आल असून याचा खर्च आमदार फंडातून घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
आता पर्यंत पाच वेळा ध्वज उतरवण्यात आला असून पाच ध्वज पुरवण्यात आले आहेतएका नवीन ध्वजासाठी १ लाख ३० हजारांची गरज आहे. प्रत्येक वेळी ध्वज खराब झाल्यास नवीन आणण्या करिता पालिकेकडे पुरें निधी उपलब्ध नसल्याने ते काम आमदार निधीतूनच करावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे
एकीकडे सरला हेरेकर यांनी इंदिरा कॅन्टीन साठी ५७ लाख रुपये निधी देण्याची मान्यता दर्शवली आहे मात्र दुसरीकडे पालिके कडे राष्ट्रीय ध्वजासाठी निधी नाही ही झाली राष्ट्र ध्वजाच्या देखभालीची गोष्ट .. बेळगावच्या पूर्व भागात असणाऱ्या पांढऱ्या हत्तीच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोण घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.