यमकनमर्डी मतदार संघात राजकारण पेटल असून कडोली ग्राम पंचायतीचा भ्रष्टाचाराचे पडसाद तालुका पंचायतीच्या सभेत उमटल्या वर आता कडोली गावात देखील जोरदार घडामोडी घडू लागलाय आहेत.
कडोली ग्राम पंचायतला शुक्रवारी टाळे टोकण्यात आले आहेत. कडोली येथे वसती योजनेत झालेला भ्रष्टचार रोखण्यासाठी पंचायतीसमोर काही ग्राम पंचायत सदस्यांनी हे आंदोलन केले आहे.कडोली ग्राम पंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मात्र याकडे कोणत्याच अधिकारी वर्गाने याकडे लक्ष दिले नाही. तसेच या भ्रष्टाचार केलेल्यवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सकाळी लवकर काही सदस्यांनी ग्राम पंचायत ला टाळे ठोकून आपला निषेध व्यक्त केला.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य सुनील कासार, बाळू डवरी बुवा, शंकर चिंचनगी, नारायण पाटील, गजानन चव्हाण आदी उपस्थित होते.आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्री पदासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मागणी करणाऱ्या यमकनमर्डी मतदार संघात मोठे भ्रष्टाचारचे आरोप करण्याते येत आहेत त्यामुळे सध्या विषय चर्चेचा बनला आहे.