कडोली ग्राम पंचायत मध्ये चाललेला भ्रष्टाचार हा आता जगजाहीर झाला आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे ग्राम पंचायत अध्यक्ष, पीडिओ यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे यमकनमर्डी क्षेत्र म्हणजे तालिबान झाला आहे असा गंभीर आरोप तालुका पंचायत सदस्य उदय सिद्दन्नावर यांनी केला आहे.
शुक्रवारी बेळगाव तालुका पंचायतीची सभा झाली त्या सभेत सदस्य या नात्याने बोलताना सिद्दन्नावर यांनी यमकनमर्डी मतदार संघातील नेत्यावर नाव ने घेता तालिबानी असा उल्लेख करत आरोप केला आहे.तालुका पंचायत सर्वसाधारण सभेत वस्ती योजनेचा संदर्भात आरोप करत असताना उदय सिद्दन्नावर बोलत होते. अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष मारुती सनदी होते.
उदय सिद्दन्नावर हे या अगोदर एकीकरण समितीचे जिल्हा पंचायत सदस्य होते आता ते तालुका पंचायत सदस्य आहेत.
राजकारणात सिद्दन्नावर यांच्या वक्तव्याकडे फार गंभीर पहिले जात असून अगोदरच यमकनमर्डी मतदार संघ चर्चेत असताना तालिबानी असे वक्तव्य येणे म्हणजे तिथल्या स्थानिक लोक प्रतिनधी वर नाव न घेता केलेली टीका आहे अस बोललं जात आहे.