Friday, January 10, 2025

/

रवी ‘एकलव्य डान्स गुरू’

 belgaum

कोणताही गुरू नसताना एकलव्य श्रेष्ठ धनूरधारी बनतो हे आपण महा भारतात पाहिलंय,गुरू मानलेल्या द्रोणाचार्य यांचा पुतळा बनवून शिक्षा घेत एकलव्य श्रेष्ठ धनूरधारी बनलेला असतो त्याच पद्धतीनं कुठेही डान्स क्लास जॉईन न होता किंवा कोणत्याही प्रकारची नृत्य शिक्षा न घेता केवळ डान्सचे प्रकार टी व्ही वर पाहून नृत्य कलेत यश मिळवलेला अवलिया म्हणजे एकलव्य डान्स मास्टर रवी शेठ… कुणीच गुरू नसताना एकलव्य ठरलेला हा डान्स मास्टर आज अनेकांसाठी द्रोणाचार्य ठरत आहे.

RAvi seth

बेळगावच्या रवी शेठ या डान्सर, डान्स ट्रेनर आणि कोरिओग्राफर रवी शेठ याने इलूजन या प्रकारात जागतिक विक्रम केला आहे. ज्येष्ठ डान्स स्टार प्रभू देवा कडून तो नावाजला गेला आहे.
तो राहणार नाझरकॅप वडगांव बेळगांव येथील तो आज डान्स मास्टर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने
३ गीनिज बुक अॉफ रीकॉर्ड मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
ईलूजन या डान्स प्रकारा मधे कॅनडा येथे जागतिक विक्रम केला आहे.सद्या zTV dance Karnataka dance मधे कोरीयोग्राफर महणून बेंगलोर ला काम करत आहे आणि पहिल्याच एपीसोडमध्ये २ वेळा बेस्ट कोरीयोग्रोफर म्हणुन सन्मानित झाला आहे.
बेळगावच्या २५ जुनियर सिनीयर कलाकाराना मोफत संधी मिळवून दिली व या पुढे ही मिळणार आहे.राउंड चश्मा  व हेअरी या नावाने संपुर्ण कर्नाटका मधे प्रसिद्ध आहे.जागतिक दर्जेचे नृत्य आविष्कार तो करतो.त्याचे आई वडील लहानपणीच वारलेत,गुरू शिवाय डान्स शिकलेला कलावंत असून फक्त TV पाहुन तो शिकला आहे.अनेक TV चॅनेल्स वर या पुर्वी काम करून नाव कमावले असून त्याने १०० कलाकारांना मोफत व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.

झी टी व्ही वर रवि हा आपल्या स्पर्धकासह फाईनल ला पोचणार यात शंका नाही मात्र फाईनल ला सर्वे त्याला मतदान करुन त्याचे हात बळकट करणे प्रत्येक बेळगावकराचे कर्तव्य आहे
हा कार्यक्रम zee tv कन्नड वर शनिवार आणी रविवारी सायंकाळी ७.३० ला प्रसारण होतो
एकंदर नृत्य क्षेत्रात बेळगावच्या रवि शेठ नावाचे वादळ बेंगळुरू येथे गर्जत आहे.त्यास बेळगाव live कडूनही शुभेच्छा

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.