लहान मुलांना प्रमाणापेक्षा अधिक कोंबून शाळेला घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा वर आता बेळगाव पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.पोलीस खात्याने शहरातील विविध शाळांमधून खास मोहीम राबवून प्रमाणा पेक्षा अधिक विद्यार्थी भरलेल्या ऑटो रिक्षांची नवीन यादीच बनवली आहे.
पोलिसांनी चालवलेल्या विशेष अभियानात वर्दीत गर्दी करत असलेले जवळपास 81 ऑटो रिक्षांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ऑटो वर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.एका रिक्षात कमीत कमी दहा ते बारा विद्यार्थ्यांना नेण्याची मुभा असताना बेळगाव शहरात याचे पालन होताना दिसत नाही.
वर्दीत गर्दी करणाऱ्या ऑटो चालका विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांचे अभियान पुढे देखील सुरूच राहणार आहे. पोलीस प्रशासनाने शाळा प्रशासनास देखील याबाबत ताकीत दिली असून ऑटो मध्ये कमी विद्यार्थि कसे प्रवास करतील याकडे गांभीर्याने लक्ष द्या अशी सूचना देण्यात आली आहे. अशी वाहने आढळल्यास मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई केली जाईल असे देखील शाळा प्रशासनास कळवलं आहे.
पोलिसांच्या या वर्दीत गर्दी मोहिमे नंतर ऑटो चालक सुधारतील का हे पाहणे गरजेचं आहे.