बायोडिझेल उत्पादनासाठी उपयुक्त
जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या मेकॅनिकल शाखेतील अंतिम वर्ष शिकत असलेल्या
विद्यार्थ्यांनी कमी दाब क्षमतेचा रिऍक्टर बनवला आहे.
बायोडिझेल उत्पादनासाठी तो उपयुक्त ठरणार आहे.
रजत, तुषार, रोहित आणि रॉबिन यांनी हा तयार केला असून त्यांना प्रा भास्कर बोगार यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पाचा उपयोग दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या बायोडिझेल उत्पादनासाठी होऊ शकतो. प्राचार्य डॉ के जी विश्वनाथ, एच ओ डी प्रा डी बी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.