गुरुवारी सायंकाळी सौदी अरेबियात चंद्र दर्शन झाल्याने शुक्रवारी सौदी सह आखातात रमजान ईद साजरी करण्यात येणार असली तरी गुरुवारी बेळगावसह अनेक शहरात चंद्र दर्शन न झाल्याने बेळगाव शहर परिसरात शनिवारी दि. १६ रोजी रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी बैठकीत देशात कोण कोणत्या शहरातून चंद्र दर्शन झाले याची माहिती घेण्यात आली.
गुरुवारी सायंकाळी शहरातील अंजुमन सभागृहात मुस्लीम समाज प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात शनिवारी ईद साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शनिवारी ईद होणार असल्याने उद्या शुक्रवारी देखील ३० वा उपवास(रोजा) आचरण केल जाणार आहे.
शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता अंजुमन इस्लाम संस्थेच्या वतीने इदगाह मैदानावर विशेष नमाज होणार असल्याचे देखील ठरवण्यात आले. यावेळी मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती अब्दुल अजीज,मुफ्ती मंजूर आलंम,अंजुमन इस्लामचे अध्यक्ष असिफ सेठ,वफ्त बोर्ड अध्यक्ष अब्दुल गफार घीवाले यांच्यासह पंच समिती सदस्य बैठकीत होते.