बेळगाव महा पालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा आणि केरकचऱ्याची तातडीने उचल करून स्वच्छता ठेवा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. गुरुवारी सकाळी शिवसेनच्या एका प्रतिनिधी मंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेऊन सदर विषयाचे निवेदन सादर केले.
महा पालिका कार्यक्षेत्रात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या चिकन गुनिया सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून पावसाळ्यात ही समस्या वाढू शकते. रस्ते दुरुस्ती साठी रस्त्यांच्या बाजूंला काढण्यात चरी बुझवण्यात आल्या नसून त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
शहरात ठिकठीकाणी गटारी घाण पाण्याने तुंबल्याने गटारींच्या पाण्याने विहिरीचे पाणी देखील दुषित झाले आहे या सगळ्या गोष्टीकडे महा पालिकेने लक्ष ध्यावे अशी देखी निवेदनात मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनचे तालुका प्रमुख सचिन गोरले,प्रकाश शिरोळकर,सुनील पाटील,तानाजी पावशे,विजय मुरकुटे,राजकुमार बोकडे,प्रवीण तेजम,आदी उपस्थित होते.