२०१८-१९ वर्षाच्या कृषी अभियानाचे उद्घाटन आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी केले.दरवर्षी मान्सूनच्या हंगामात कृषी जनजागृती अभियान करण्यात येते.खानापूर येथून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
या अभियाना अंतर्गत तालुक्यात गावा गावात जाऊन कृषी खात्याच्या योजना बद्दल फिरत्या वाहना सह जनजागृती करण्यात येते.
प्रत्येक गावात सभा बैठका,वस्तू प्रदर्शन घेण्यात येतात कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान,मुख्य पिके,वेगवेगळे विशेषज्ञ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पिके कशी घ्यावीत शासकीय योजनाचा लाभ कसा घ्यावा या बद्दल माहिती देण्यात येते. उद्या पासून जांबोटी,१९ जून रोजी बिडी,२० रोजी गुंजी येथे या अभियाना अंतर्गत कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी चव्हाण यांनी दिली.
कृषी यांत्रिकयोजने अंतर्गत दोन शेतकऱ्यांना सबसिडीसह दोन पाव टेलर टकटर वितरीत करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.