दरवर्षी बोगस बियाणे आणि खत विक्रीवर कृषी खात्याने करडी नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. खत आणि बियाणामध्ये भेसळ होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याचा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे.
कृषी अधिकारी यांनी अवैद्य खतांचा व्यापार करणाऱ्या वर एक पथक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. या पथकाने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठविणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात शा पथकाने ६ कोटींहून अधिक खत आणि बियाणे जप्त केली आहेत. ५४ जणांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र परवाने रद्द करण्याऐवजी त्यांच्यावर निलंबित करावे अशी मागणी काही शेतकरी संघटनांनी केली आहे. बेळगाव मध्ये हे पथक स्थापण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.