आश्वासन दिल्या पेक्षा दुपटीने कामे करून दाखवतो असे वक्तव्य करणाऱ्या ग्रामीण मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांची झडती घेतली आहे.
बुधवारी जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात ग्रामीण भागातील विविध विकास कामांचा आढावा घेतला यावेळी बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं.
गेल्या 25 वर्षातील कामे आगामी पाच वर्षात करून दाखवीन असा दावा मी करत असून माझ्या वेगाला अधिकाऱ्यांनी जुळवून घेऊन कार्य करावे जमलं तर काम करा अन्यथा तुम्हाला जमेल त्या भागाला निघून हा अशी ताकीत देखील त्यांनी बैठकीवेळी दिली.
या मागे काय केलंय हे मी विचारणार नसून अधिकाऱ्यांना तीन महिन्याचा अलटीमेंटम देत आहे आज पासून नवीन अध्याय सुरू करा सरकार दरबारी कोणतीही अडचण भासल्यास मला 24 तास कधीही संपर्क साधा अश्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.किती जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रे आहेत की रस्त्यांची डागडुजी झालेय किती रस्ते सुसज्ज आहेत किती रस्त्यांची गरज आहे याचे प्रपोजल जिल्हा परिषदेकडे पाठवा सरकार दरबारी निधी मंजूर करण्याची जवाबदारी माझी आहे असेही त्या म्हणाल्या.
हलगा बस्तवडच्या लोकांनी सुवर्ण विधान सौध करीता जमिनी दिल्यात राकस्कोप येथील लोकांनी जलाशयासाठी जमिनी दिल्यात मात्र तिथे पिण्याच्या पाण्याची सोय,नागरी सुविधा नाहीत तुरमुरीतील लोकांनी कचरा डेपो साठी जमिन दिली ते देखील विकासा साठी वंचित आहेत ही कामे झाली पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.
बैठकीत जिल्हा उपविभागीय अधिकारी, जिल्हा पंचायत सी इ ओ, तालुक पंचायत अध्यक्ष आणि विविध अधिकारी उपस्थित होते.