मध्यवर्ती बस स्थानका सोबत शहरासाठी असलेल्या सी बी टी बस स्थानकाचे देखील आधुनिकीकरण होणार असून कोल्हापूर बस स्थानका सोबत याचा देखील कायापालट केला जाणार आहे.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत 33 कोटींचे अनुदान सी बी टी साठी राखीव करण्यात येणार असून यात पार्किंग आणि बहुमजली इमारत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मध्यवर्ती बस स्टँड चे आधुनिकीकरण सुरू असताना शहराच्या बस स्टँड कडे दुर्लक्ष झाले होते या ठिकाणी अनेक गैरसोयी आहेत खड्ड्यांचे साम्राज्य आहे त्यामुळे सुविधे अभावी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे याचा विकास स्मार्ट सिटी योजनेतून केला जाणार आहे.
कन्सल्टंट कंपनी कडून आराखडा तयार करण्यात आला आहे एकूण दोन एकर दहा गुंठे जागेत 32 बस थांबे,बहुमजली पार्किंग, दुचाकी चार चाकी पार्किंग तसेच पहिल्या मजल्यावर व्यापारीगाळे,विविध कार्यालये, शो रूम बनवले जाणार आहेत.या सर्वांसाठी निविदा मागवण्यात आली असून प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती स्मार्ट सिटी अभियंत्यांनी दिलीय.