पांगुळ गल्लीत नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीची अखेर खुदाई करण्यात आली आहे कारण रस्ता आणि गटार घरे दुकानापेक्षा उंचीवर बांधण्यात आली पावसात असल्याने पांगुळ गल्ली सह या भागातील घरे आणि दुकानात पाणी घुसत होत.
गेल्या एक जून रोजी झालेल्या मान्सून पूर्व वळीव पावसात पांगुळ गल्ली,मोतीलाल चौक,भेंडी बाजार भागातल्या घरात आणि दुकानात पाणी घुसलं होत यावेळी या भागातल्या संतप्त लोकांनी पालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांना धारेवर धरलं होत.
रविवारी सकाळी पावसाला सुरुवात होताच पालिकेचे कर्मचारी या भागात दाकःल झाले अन त्यांनी नाव्य्नी बांधलेली गटार आणि रस्त्याची खुदाई केली. योग्य नियोजन करून रस्ते गटार करण्या ऐवजी उंच केल्याने पावसात पांगुळ गल्ली तुंबली होती घरात दुकानात पाणी घुसलं होते याच वृत्त बेळगाव live ने सर्व प्रथम प्रसारित केल होते. १ जून चे वृत्त खालील लिंक क्लिक करून पाहू शकता …
अखेर रविवारी पालिका प्रशासनाला जाग आली असून रस्ते गटारीची खुदाई करण्यात आली आहे बेळगाव live impact…