शुक्रवारी एन आय ए या यंत्रणेने बंगळूर येथील विशेष न्यायालयासमोर बनावट नोटा प्रकरणी दोशारोप पत्र दाखल केले आहे. चिकोडी मध्ये सापडलेल्या २००० रुपयांच्या बनावट नोटा बांगलादेश येथून आल्या होत्या हे तपासात उघड झाले आहे.
तिघा जणांवर दोषारोप दाखल झाले आहेत. दलीम मिया उर्फ जलीम उर्फ यासिन मुल्ला उर्फ दलू ( रा. पश्चिम बंगाल), अशोक कुंभार(रा. चिकोडी), राजेंद्र पाटील( रा. चिकोडी) अशी त्यांची नावे आहेत. कलम १२० बी, ४८९ बी, ४८९ सी ३४ व २०१ त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.
हा गुन्हा पूर्वी चिकोडी पोलीस स्थानकात दाखल झाला होता. आरोपीना अटक करून पाहणी केली असता ८२००० रुपये किंमतीच्या २००० रुपयेच्या बनावट नोटा मिळाल्या होत्या.
ही केस एन आय ए कडे वर्ग करून चौकशी होताच आरोपींनी या नोटा बांगलादेश मार्गे आणून भारतीय चलनात लाखो रुपये मिसळले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.