Saturday, January 4, 2025

/

मातृत्व आणि स्तनपान-वाचा काय आहे डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व आणि आपल्या तान्हुल्याला स्तनपान देणे हे अत्युच्च आनंदाचे क्षण असतात. आईचे दूध हे बाळासाठी अमृत असते. बाळाचा जन्म झाल्यावर जननग्रंथीतून मेंदूकडे संदेश जातात आणि मातेला पान्हा फुटतो. प्रसुतीनंतर पहिले तीन दिवस येणारे दूध हे दाट आणि पिवळसर असते. जरी कमी प्रमाणात असले तरी बाळाची भूक शमवणारे असते. यालाच ’कोलोस्ट्रम’ म्हणतात. यामध्ये बाळाची प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात. तसेच प्रथिने, चरबी व पिष्टमय पदार्थ असतात. तसेच प्रथिने, चरबी व पिष्टमय पदार्थ असतात जे बाळाची वाढ होण्यास आवश्यक असतात. या दुधामुळे बाळाच्या आतड्यांत वितंचके (एन्झाईम्स) तयार होण्यास मदत होते व पचनसंस्थेचे कार्य सुधारते. शिवाय आतड्यातील संरक्षणात्मक उपयुक्त जंतू निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे अन्नाचे शोषण व्यवस्थित होते. बाळाच्या जन्मानंतर हेच दूध पाजणे योग्य आहे. मध चाटवणे, साखरपाणी पाजणे हे अशास्त्रीय आहे. बाळाच्या वयाच्या पहिल्या चार महिन्यात फक्त आईच्या दूधानेच बाळाची सर्व आवश्यकता भागवली जाते. वरून पाणी पाजण्याचीही आवश्यकता भागवली जाते. वरून पाणी पाजण्याचीही आवश्यकता नसते.

STanpan

मातेच्या दूधातील घटक- मातेच्या दर 100 ग्रॅम दुधामध्ये 1.2 ग्रॅम प्रथिने, 3.8 ग्रॅ. चरबी, 7 ग्रॅम पिष्टमय पदार्थ असतात. याशिवाय क्षार, कॅल्शियम, मीठ, पोटॅशियम, अ, ड, ब, आणि ई ही जीवनसत्त्वे असतात. 100 ग्रॅम दुधापासून बाळाला 71 कॅलरीज मिळतात.

स्तनपानाचे फायदे

बाळाला स्तनपान करण्याने मातेचे विस्फारित झालेले गर्भाशय पूर्वस्थितीला येते व पोटाचा घेर कमी होतो. पोट सुटत नाही.

आई व मूल यांच्यातील मानसिक दुवा बळकट होतो. मुलाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते.

आईच्या दुधातले घटक पूर्णतः कृत्रिमरीत्या बनवणे शक्य झालेले नाही. अगदी चांगल्यात चांगल्या लॅक्टोजेन यामध्येही सर्व घटक उपलब्ध नाहीत. त्यामुळे आईच्या दुधाला पर्याय नाही.

बाळाची प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक अर्थात तयार संरक्षक पेशी बाळाला आईच्या दुधातून रेडिमेड मिळतात.

बाळाचे वजन, नैसर्गिक आरोग्य, पोट स्वच्छ राहणे, त्वचा, केस, स्नायू, हाडे यांचे आरोग्य यासाठी स्तनपानच योग्य आहे.

स्तनपान व्यवस्थित कसे होईल?

स्तनाग्रे व्यवस्थित नसल्यास दूध पाजताना चिरा पडणे, रक्त येणे, बाळाला व्यवस्थित चोखता न येणे असे त्रास होऊ शकतात. त्यासाठी गरोदरपणात साध्या तेलाच्या साहाय्याने आवश्यक आकार दिल्याने फायदा होतो. प्रथमच प्रसुती असेल तर बाळाला कसे घ्यावे याचीसुध्दा मातेला माहिती नसते. पाठीला आधार घेऊन एका हाताचा टेकू बाळाला देऊन दूध पाजणे शास्त्रीयरीत्या योग्य आहे. आईचे मन प्रसन्न असावे. क्षोभ, राग, दुःख यावर नियंत्रण असावे. दोन्ही बाजूला सारखेच पाजावे. दर दोन तासांनी किंवा बाळाला भूक लागल्यावर स्तनपान करावे. शारीरिक स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. नैसर्गिक प्रसुती असो किंवा सिझेरियन असो प्रसुति झाल्या झाल्या बाळाला पाजण्याने निसर्गतःच भरपूर दूध येते. काही अडथळा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

स्तनपानाविषयी होणारे त्रास-

1) दूध कमी येणे, बंद होणे

2) स्तनपान गाठी होणे

3) क्वचित इन्फेक्शन होऊन पू होणे

4) स्तनाग्रांना भेगा पडणे, रक्त येणे इ.

उपचार

बाळाला भरपूर पाजूनसुध्दा जडपणा येत असल्यास दूध पिळून टाकावे लागते. दूध कमी झाले असल्यास आहारात खसखशीची खीर, हळीव, शतावरी यांचा जरूर वापर करावा.

होमिओपॅथिक उपचार

बाळाच्या व आईच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असे उपचार होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत.

* दूध बंद किंवा कमी झाले असल्यास लॅक डिफ्लोरेटम, रिसीनस कम्युनिस, व्हॅलेरियाना अशी औषधं वापरून दुधाचे प्रमाण वाढवता येते.

* आई तणावाखाली असून त्यामुळे जर दूध स्रवत नसेल तर कालीफॉस, पॅसीफ्लोरा अशी औषधे उपयुक्त ठरतात.

* स्तन घट्ट होऊन गाठी झालेल्या असल्यास, ताप येत असल्यास बेलाडोना, कार्बोअ‍ॅनिमॅलिस, कोनियम, फायटोलॅका अशी औषधं गुणकारी आहेत.

* स्तनाग्रांचा दाह होऊन चिरा पडत असल्यास काही होमिओपॅथिक मलम आहेत जे वापरल्यामुळे बाळालाही धोका नसतो व त्रासही कमी होतो.

* क्वचित काही प्रसुतींमध्ये बाळ दगावते, त्यावेळी दुग्धस्राव बंद करण्यासाठी व मातेच्या मनावरील आघात कमी करण्यासाठी उत्कृष्ट, दुष्परिणाम विरहित औषधे होमिओपॅथीमध्ये आहेत.

परंतु ही औषधे होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत, अन्यथा अपेक्षित परिणाम साधता येत नाही.

 

Dr sonali sarnobat

संपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक -9916106896
सरनोबत क्लिनिक-9964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.