शेतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्याने पिकांना फवारणी करण्यासाठी आणलेले कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना हिरेबागेवाडी जवळील विरपनकोप्प येथे घडली आहे.
जिन्नप्पा गंगप्पा अमरापूर वय 61 वर्षे रा. विरपनकोप्प असे मयत शेतकऱ्यांचं नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँक ऑफ इंडिया,बसवेश्वर सोसायटी अश्या विविध बँका पथ संस्थांची मिळून अंदाजे 9 लाखांच कर्ज होते त्याची परतफेड कशी करावी याची चिंता असल्याने नाराज झाल्याने शेतीला फवारणी करण्यासाठी आणलेल कीटकनाशक सेवन करून त्यांनी आत्महत्या केली आहे.
कीटकनाशक सेवन करताच अत्यवस्थ अवस्थेत जिन्नप्पा यांना 7 जून रोजी सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी दि 8 रोजी सकाळी त्यांचं निधन झालं आहे. बागेवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.