मतदार संघातील जनतेला भरपूर आश्वासने दिली आहेत मंत्री पद नाही मिळालं तरी काय झालं दिलेल्या आश्वासनांपेक्षा दुप्पट कामे करून दाखवणार असे वक्तव्य करत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एकीकडे मंत्री पद न मिळाल्याने नाराजी तर व्यक्त केलीच आहे दुसरीकडे पक्षाने घेतलेल्या निर्णयास कटिबद्ध असल्याचे देखील म्हटलंय.
मंत्री पदाने हुलकावणी दिल्यावर मतदार संघात दाखल होताच त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे.
वरिष्ठ नेत्यांनी मंत्री करू असं सांगितलेलं मात्र माशी कुठं शिंकली का आणि कशासाठी मंत्री पद हुकल मला माहित नाही मात्र मंत्री पद गेलं म्हणून गप्प बसणार नसून जोराने कामाला लागू अस देखील त्या म्हणाल्या.
पक्षाने मला तीन वेळा तिकीट दिल मला मोठं होण्यात पक्षाचं मोठं योगदान आहे हाय कमांडने मागिळवेळी एम एल सी ना मंत्री पद नाही असं म्हटलं होतं स्त्री पक्ष संघटना बळकट केलेल्या मोटमम्मा यांना मंत्री पदा पासून यामुळेच वंचित रहावं लागलं होतं मात्र यावेळी एम एल सी असलेल्या जयमाला यांना मंत्री पद मिळालं आहे हे कसं?असा सवाल करत वरिष्ठ असं का वागले हा प्रश्न मला सुद्धा पडला आहे त्याचं उत्तर शोधणार असल्याचे त्या म्हणाल्या. जयमाला यांच्या सोबत माझे चांगले संबंध आहेत त्यांच्या कार्यास शुभेच्छा त्यांनी दिल्या.