लोकशाहीत प्रत्येकाला सत्ता हवी आहे पण योग्य वेळेत त्यागाची भावना प्रत्येकाच्या मनात हवी असा टोला पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बंधू सतीश जारकीहोळी यांना लगावलाय.
मंत्री पदाची शपथ घेऊन पहिल्यांदा बेळगावला आले असता विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते.कुणीही मध्यस्थी करायला तयार असल्यास सतीश जारकीहोळी यांना मला मिळालेलं मंत्रिपद द्यायला तयार आहे सतीश यांनी मंत्री पदाची मागणी केलेली मात्र मला मिळालंय मागील वेळी मला मंत्री पदाची संधी हुकलेली त्यावेळी मी गप्प होतो असाही उपरोक्त टोला सतीश यांना लगावला.
सतीश हे अनुभवी राजकारणी आहेत त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केलंय ते नाराज आहेत त्यांची मनधरणी करायला ते लहान बाळ नव्हेत राजकारणात ते प्रगल्भ राजकारणी आहेत परिस्थिती जाणून घेतील.. काँग्रेस पक्ष समुद्रा एवढा मोठा आहे सतीश आणि रमेश पेक्षा पक्ष मोठा आहे. आगामी एका आठवड्यात सर्व ठीक होईल असेही ते म्हणाले.