बेळगाव शहराच्या सुंदरतेत भर घालणाऱ्या लक्ष्मीटेक भागाकडे जाणारा रस्ता कुरूप बनला आहे. पाईपलाईन बस स्टॉप पासून लक्ष्मीटेक कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खुली कचराकुंडी अशीच झाली आहे.
या भागात नागरिकांनी फेकलेला कचरा पूर्ण रस्ताभर पसरत आहे. याचा त्रास ये जा करणार्याना होत आहे.
सरस्वती नगर, महालक्ष्मी नगर, पार्वती नगर, सैनिक नगर व इतर भागातील नागरिकांना दुर्गंधी सोसावी लागत आहे. हा कचरा कुजत आहे. कुत्री व डुकरे पसरवत आहेत.
बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत, मनपा आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड या तिन्ही यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असून लोक आंदोलन करण्याचा विचारात आहेत.