पावसाळी रताळी अजून उशीर असले तरी उन्हाळी रताळी काढणीला वेग आला आहे. राकसकोप जलाशयातील पाणी साठा कमी झाला की या परीसरातील शेतकरी रताळी पीक घेतात. आता उन्हाळा संपत आला असला तरी उन्हाळी रताळी काढणीला या भागात उत आला आहे.
राकसकोप धरणाच्या बाजूला असलेल्या शेतीत कमी पाण्याची पिके घेत असतात. रताळी, मिरची, भुईमुंग, कोबी, बटाटे आदी पिके घेतली जातात.
फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केलेली रताळी आता ती काढण्यात येत आहेत. एकरास २०० क्विंटल रताळ्याचे उत्पन्न मिळण्याचा मानस आहे. त्यामुळे शेतकरी आता रताळी काढणीच्या कामात गुंग झाल्याचे दिसून येत आहे.