मिलिटरी प्रशासनाच्या व्याप्तीत येणारे ८ रस्ते सर्व सामान्य जनतेला वाहतुकीसाठी खुले करण्याची तोंडी मंजुरी छावणी सीमा परिषदेच्या बैठकीत दिली आहे.बुधवारी कॅटोमेंट बोर्डाच्या झालेल्या बैठकीत ब्रिगेडीयर गोविंद कलवाड आणि खासदार सुरेश अंगडी यांनी निर्णय घेतला आहे
मराठा सेंटरने छावणी सीमा परिषद आणि मिलिटरी हद्दीतील रस्त्यात जनतेला पर्यायी मार्ग दिले आहेत अशी माहिती देताच खासदार सुरेश अंगडी यांनी सगळेच रस्ते जनतेसाठी खुले करा अशी मागणी केली.केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सर्व छावणी सीमा परिषदांना तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून जनतेला वाहतुकीसाठी रस्ते खुले करा असा आदेश बजावला असल्याची देखील अंगडी यांनी आठवण करून दिली.
स्टेनली रोड,अर्सेनल रोड,स्मार्ट रोड ,राजेंद्र सिंह रोड,चौधरी रोड.फडर रोड.लक्ष्मी मार्ग आणि अल्बर्ट एक्का रोड जनतेला खुला करून देण्याची मागणी खासदार अंगडी यांनी केली. एकूण आठ पैकी सहा रस्ते जनतेला खुले करून देण्यात येतील या शिवाय बाकी दोन रस्त्या बद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका ब्रिगेडीयर कलवाड यांनी मांडली. किल्ल्यातील मिलिटरी युनिट आणि मराठा सेन्टरच्या मिलिटरी युनिट मधून जाणारे रस्ते खुले करण्याबाबत अजून निर्णय नाही लवकरच याबाबत निर्णय होईल असे देखील ब्रिगेडीयर यांनी स्पष्ट केले.
बैठकीत उत्तरचे आमदार अनिल बेनके, छावणी सीमा परिषदच्या सी ई ओ दिव्या शिवरामन,सर्व छावणी सीमा परिषद सदस्य आणि मिलिटरी अधिकारी उपस्थित होते.