वारांगनांचा प्रवास केरळ ते बेळगाव ( व्हाया बायना बीच)
मै आयटम हूँ। मजे बेलगाम को आको चार साल हुये। मै केरलाईट। पैले गोवा जाकु ईदरकू आये मै। ईदर हमारा एजंट है। ओ देता हमना काम मिलाकू। बडे बडे लोगा आते।
हे शब्द आहेत वेशा व्यवसायात गुंतलेल्या एका दुर्दैवी महिलेचे. तिचे वय आहे फक्त २९ वर्षे. बेळगावात एक भाड्याचे घर घेऊन ती राहते. आजू बाजूला ती कारखान्यात काम करत असल्याचे सांगते, पण तिचा देह हाच तिच्यासाठी कारखाना आहे. या कारखान्यावर रोज बेळगाव भागातले दहा पंधरा जण डल्ला मारतात. फुकट नाही पैसे देऊन. त्यासाठी ती आधार घेते लॉजिग चा. ती आणि तिच्या चार मैत्रिणी यांची रोजची कमाई आहे २००० रुपये.
बेळगाव मध्ये देह विक्रीचा धंदा किती जोरात सुरू आहे, याचे हे उदाहरण. बेळगाव हे सुशिक्षित लोकांचे गाव असे या चुकीच्या नादात कसे बिघडत चालले आहे, तरुण वर्ग आणि पैसेवाले कसे या नादात हाळ होत चालले आहेत, हेच उदाहरण यामध्ये दिसून येते.
![prostitution logo](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2018/06/prostitution-01.jpg)
बेळगावातला वेशा व्यवसाय असा गुप्त पणे सुरू आहे. मोबाईल वर ग्राहक ठरवून तो चालू आहे, तो फोफावत आहे.
वेळीच सावध झालो नाही तर जसे वेगवेगळ्या कारणांनी बेळगाव प्रसिद्ध आहे, तसेच ते रेडलाईट एरिया म्हणून कुप्रसिद्ध होऊ शकते. सावधान, वेळीच सावध होण्याची गरज आहे.