तिसऱ्या रेल्वे गेट जवळचे उड्डाण पुलाचे काम आगामी 15 जुलै पासून सुरू होईल याचे टेंडर प्रोसेस होत आहे अशी माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी दिली.मंगळवारी पालिका स्मार्ट सिटी आणि रेल्वे अधिकाऱ्यांची खास बैठक घेतली त्या बैठकीत ते बोलत होते.
रेल्वेने हा प्रोजेक्ट महा पालिकेकडे पाठवला असून पालिकेत मंजुरी मिळाल्यावर टेंडर जाहीर केला जाईल असं ते म्हणाले. तानाजी गल्लीत नवीन उड्डाण पुला बाबत विचार करा असा सल्ला देखील सुरेश अंगडी यांनी दिलाय.
31 आगष्ट पूर्वी गोगटे सर्कल ( रेल्वे)उड्डाण पुलाचे काम पूर्ण करा अशी डेडलाईन ठेकेदाराला देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलं.गोगटे सर्कल उड्डाण पुलाचे काम अत्यंत धिम्या गतीनं सुरू आहे त्यामुळं कधी काम पूर्ण होईल याकडे लक्ष लागले आहे.