काँग्रेस जे डी एस सरकारच्या संमिश्र सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर गोकाक च्या जारकिहोळी बंधू पैकी एक रमेश जारकीहोळी दुसऱ्यांदा मंत्री मंडळात सामील झाले आहेत.
बुधवारी बंगळुरू मध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात बेळगाव जिल्ह्यातून रमेश जारकीहोळी यांनी शपथ घेतली. या अगोदर ते सिद्धरामय्या सरकार च्या कार्यकाळात ते मंत्री होते
पहिल्यांदाच ग्रामीण मतदार संघातून आमदार झालेल्या महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर आणि माजी मंत्री सतीश जारकीहोळी या दोघांच्या हाती निराशा आली आहे.
मंत्री पद मिळावे यासाठी सतीश आणि लक्ष्मी यांची जोरदार चर्चा होती मात्र हाय कमांडने शेवटच्या क्षणी रमेश जारकीहोळी यांच्या नावाला पसंदी दिली आहे.
लक्ष्मी आणि सतीश यांच्या शीत युद्धात रमेश जारकीहोळी यांना सलग दुसऱ्यांदा मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. सतीश लक्ष्मी वादाचा फटका जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणा वर पडू नये म्हणून रमेश यांना मंत्री बनवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.