प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये घरकुलांचे वांदे आणि त्यातील भ्रष्टाचार हा प्रकार नित्याचाच ठरला आहे. सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी अवस्था सर्वत्रच दिसून येत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असताना अनेक ग्राम पंचायत मधील घरे ही सरकारी असली तरी त्या घरावर अध्यक्षांचीच दिलजमाई असल्याचे दिसून येते आहे.
प्रत्येकाचे घरकुल असावे हे स्वप्न असते. मात्र या स्वप्नाचा चुराडा करण्यावरच ग्राम पंचायत सदस्य, अध्यक्ष व अधिकारी धन्यता मानत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या स्वप्नातील घर हे स्वप्नांत विरून जाते.
ज्यांना घरे हवी असतील तर ग्राम पंचायत सदस्य, अध्यक्ष व अधिकाऱ्यांना कमिशन दिलेच पाहिजे नाहीतर घर मंजूर होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवण्यात आली आहे. ज्यांनी कमिशन दिले नाही त्यांची घरे रद्दबातल ठरविली जातात.त्यामुळे जिल्यात शेकडो घरे वाया गेली आहेत,
महत्वाचे म्हणजे यामध्ये अध्यक्ष यांचा रोल महत्वपूर्ण ठरतो. पहिलाच टक्केवारी आणि त्यात कमिशन यामुळे प्रत्येक सरकारी घरावर अध्यक्षांची दिलजमाई ठरलेलीच असते.