शाळा आणि कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्यात यावा अशी मागणी विध्यार्थी संघटनांनी केली आहे. मागील काँग्रेस सरकारने केलेली घोषणा संयुक्त सरकारने पूर्ण करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या भाजप प्रणित संघटनेने केली आहे.
राज्य वाहतूक खाते आपल्या अंतर्गत येणाऱ्या परिवहन मंडळ मार्फत विद्यार्थी वर्गास सवलतीच्या किंमतीत बस पास देते. मागील वर्षी काँग्रेस सरकारने मागासवर्गीय मुलांना मोफत बसपास देऊन यंदा सगळ्यांनाच मोफत करतो असे जाहीर केले होते, सरकार बदलले आणि काँग्रेस व जेडीएस चे संयुक्त सरकार आले आहे. आता काँग्रेसने ही मागणी पूर्ण करून द्यावी असे आव्हान देण्यात आले आहे.