बेळगाव शहराचे माजी नगराध्यक्ष आणि बेळगावच्या प्रसिद्ध जोशी कुटुंबातील सदस्य, जगप्रसिद्ध ब्रँड अमृत मलम च्या निर्मात्या जोशी कंपनी चे मालक शरद जोशी यांचे सुपुत्र ही शैलेश जोशी यांची ओळख.
सेंट मेरीज स्कुल मधून शिक्षण घेऊन ते जीएसएस कॉलेज मधून कॉलेजचे शिक्षण घेतले. त्यानंतर के एल ई फार्मसी कॉलेज मधून औषध उत्पादन अभ्यासक्रम पूर्ण केला.
अमृत फार्मा या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते काम करत होते. अमृत पोतदार सिसिआय क्रिकेट क्लब चे मालक होते. जोशी कंपनी चे मालक होते.
त्यांनी भाजप या पक्षातही प्रवेश करून सामाजिक काम आणि राजकीय कारकिर्दही सुरू केली होती.
अमृत मलम हे घरा घरात वापरले जाणारे मलम ते उत्पादित करत यामुळे ते प्रत्येकाच्या जवळचे होते.