स्वतःवर गोळी झाडून घेऊन उद्योजक शैलेश जोशी वय 40, रा.विजय नगर, यांनी आत्महत्या केली आहे. स्वतः व्यसनमुक्त होऊन इतरांना व्यसनमुक्तीचा धडा देणाऱ्या या तरुण उद्योजकाने अचानक आपले जीवन संपविले आहे, यामागचे कारण अजून शोधले जात आहे.
मध्यरात्री दीड वाजता पाईपलाईन रोड गणेशपुर येथील स्वतःच्या घरी स्वतःच्याच रिव्हॉल्व्हर ने गोळी झाडून घेऊन त्यानी आत्महत्या केली आहे.
बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे ते चिरंजीव. अमृत मलम, अमृत फार्मा आदी कंपनीचे ते मालक आहेत.
मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान पिस्तूलने हृदयावर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती कॅम्प पोलीस निरीक्षकानी बेळगाव live कडे दिली आहे.
मध्यरात्री गोळीचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी कॅम्प पोलिसांना कळवले. पोलिसांनी पाहणी करता ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज सोमवारी पहाटे पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेम साठी आणण्यात आला आहे.