काँग्रेसचा कार्यकाळ संपूर्ण देशाने अनुभवला आहे जनतेला काँग्रेस काय चीज आहे त्याची कल्पना आहे एकवेळ ब्रिटिशांवर विश्वास ठेवा खरं काँग्रेस वर नको अशी टीका खासदार सुरेश अंगडी यांनी केली आहे.बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या अगोदर अनेकांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन काढून देखील घेतला आहे सत्तेसाठी काँग्रेस कडून हातमिळवणी केलेल्या कुमारस्वामी यांनी आपला पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करावा असा सल्ला देखील त्यांनी एच डी कुमारस्वामी यांना दिला आहे.सत्तेत येऊन 24 तासाच्या आत शेतकऱ्यांची कर्ज माफी करणारे सरकार सथापन करून एक आठवडा उलटला तरी का गप्प आहेत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय.
फसल विमा योजनेत बैलहोंगल तालुक्यातील शेतकऱ्यांना 21 कोटी रुपयांची मदत मिळत असून एकूण बेळगाव जिल्ह्यास 84 कोटींची मदत मिळत आहे यातील 84 कोटी 11 लाख वितरित झाली असल्याचे ते म्हणाले.बैलहोंगल तालुक्यातील शेण खत समस्या सोडवण्यासाठी 900 टन शेण खत वितरित करणार असल्याचे त्यांनी नमूद केलं.
निवडणूक जवळ आली वाटते