Monday, December 30, 2024

/

भूतरामहट्टी जवळ तरुण गेला वाहून

 belgaum

शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने हायवे बाजूच्या चरीत पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने एक तरुण वाहून गेला आहे तर एक जण बचावला आहे.

Youth death highway, heavy rainfall

इम्रान नदाफ वय 22 वर्षे रा.कोटगेरी तालुका हुक्केरी असं पाण्यात वाहून गेलेल्या मयत युवकाचा नाव आहे. भूतरामहट्टी जवळ पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग चार वर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

घटनास्थळा वरून समजलेल्या माहितीनुसार मयत इम्रान आणि त्याचा भाऊ दुचाकी वरून बेळगावच्या दिशेने येत होते पाऊस पडत असल्याने सर्व्हिस रोड वर दुचाकी घेतली असता हायवे आणि सर्व्हीस रोड च्या मधल्या चरीत जोरदार पाणी आल्याने इम्रान पाण्यात वाहून गेला तर एक जण बचावला आहे.बचावलेल्या भावाने मयत इम्रान ला वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाण्याचा स्तर वाढला वाहून गेला त्याचा काहीही उपयोग झाला नाही.पाण्याच्या प्रवाहात वाहून त्याचा मृतदेह हायवे बाजूच्या चरीत पडला होता.

घटनास्थळी काकती पोलीस रवाना झाले असून मयत युवकाचा मृतदेहाचा शोध घेतला. काकती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.