बेळगावचा साईश सोलनकर. वय फक्त १७ वर्षे, जगातील सर्वात कमी वयाचा संशोधक, हिरव्या रंगाच्या अनाकोंडा या सापाच्या जातीवर पेरू या देशात जाऊन संशोधन करणार आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशातील या जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या सापावर संशोधन करणाऱ्या टीम मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
नॅशनल जिओग्राफिक फेम पॉल पिटमन, मोहसीन कझमी, ट्रेवोर फ्रॉस्ट यांची ही टीम आहे. पेरू देशातील तांबोपाता नदीच्या माद्रे डी डिओस प्रांतात हे संशोधन होईल.
१५ दिवसाची ही मोहीम आहे. आव्हानात्मक शोध कार्य होईल. अतिशय घनदाट अशा अरण्यात ही मोहीम होईल, किंग कोब्रा मॅन गौरी शंकर या टीमचे नेतृत्व करेल.
साईश ने बेळगावच्या लव्ह डेल स्कुल मध्ये शिक्षण घेतले आहे. पुणे येथील वाडिया कॉलेज मध्ये तो शिकत आहे. प्राण्यांच्या विविध जातींचा अभ्यास करण्याचा व त्यावर फिल्म तयार करण्याचा छंद त्याला आहे.