Wednesday, November 20, 2024

/

सुलभ प्रसूतीसाठी -वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

प्रत्येक गर्भवती स्त्रीला प्रसूती कशी होते याविषयी प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. प्रसूतीसाठी त्या स्त्रीची भावनिक, मानसिक आणि शारीरिक तयारी होणे मुख्य असते. गर्भधारणा होणे जितके नैसर्गिक आहे तितकेच प्रसूत होणे हेही नैसर्गिक आहे.

Dr sonali sarnobat

गरोदरपणात अगदी पाळी चुकल्यापासून फोलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या घेणे, नंतर नऊ महिन्याच्या काळात डॉक्टरनी दिलेली आवश्यक पोषके घेणे बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यकच असते. शिवाय दोनवेळा सोनोग्राफी, कमीतकमी एकदा पूर्ण रक्त लघवी तपासणी धनुर्वाताची इंजेक्शन्स् या सर्वांची आवश्यकता असते. यामध्ये कुचराई करू नये. प्रत्यक गर्भवती स्त्रीमध्ये प्रसूति ही वेगवेगळ्या स्वरूपा वेगवेगळ्या पध्दतीने होताना दिसून येते. हे जरी खरे असले तरी काही क्रिया प्रत्येक प्रसूतसीच्या वेळी नैसर्गिकरित्याच दिसून येतात.

त्याची माहिती प्रत्येक स्त्रीला असणे आवश्यक आहे. प्रसूती होण्याची वेळ जवळ आली की योनीमार्गातून एक चिकट पांढरट स्राव बाहेर पडतो यालाच ’शो’ म्हणतात. त्यातूनच रक्तस्राव होण्याचीही शक्यता असते. हा स्राव प्रसूतीक्रिया सुरू झाल्याचे लक्षण समजून स्त्रीने प्रसूतीग्रहात जायला हवे. नंतर पाठीतून कळा येऊ लागतात. पाठीकडून पोटाकडे व नंतर खाली अशा जोरकस कळा आल्या म्हजे या खर्‍या प्रसूतीवेणा म्हटल्या जातात. त्यानंतर गर्भाशयमुख विस्फरित होऊ लागते. पुर्ण विस्फारित झाल्यावर कळ आल्या आल्या खोल श्‍वास घेऊन शौचास जोर केल्यापप्रमाणे कळा द्याव्या लागतात. ही प्रसूतीची प्रथम अवस्था असते. त्यानंतर बाळ हळुहळू खाली सरकते. प्रत्यक्ष बाळाचा जन्म झाली की, प्रसूतीची दुसरी अवस्था संपते.

या अवस्थेमध्येच अनेक अडचणी येण्याचा संभव असतो. तिसरी अवस्था म्हणजे बाळाला पोषण पुरवणारी नाळ आणि वार बाहेर पडणे. यात फारशा वेदना होत नाहीत. किंबहुना बाळाचा जन्म झाल्यावर स्त्रीच्या मनाचा ताण व शारीरिक वेदना पूर्णपणे नाहीशा होतात. एक गोष्ट गर्भवती स्त्रियांनी लक्षात ठेवली पाहिजे की प्रसूती ही क्लेशकारकच असणार आहे. पण प्रसूतीनंर बाळाला पाहिल्यावर या वेदना वांझ नसतात हे मनोमन पटते. म्हणून मनाचा निग्रह करून या काळाचा अनुभव एन्जॉय करावा. प्रसूतीकडे अनुकूल दृष्टीने पाहिल्यास वेदनासुध्दा सुसह्य होतात.

उपचार

प्रसूती ही एक नैसर्गिक क्रिया आहे, पण एखादी स्त्री जर मानसिक दडपणाखाली असेल, निराश असेल तर प्रसूतीकष्टपद होण्याचीच शक्यता जास्त असते अशावेळी होमिओपॅथिक पुष्पौषधीची मदत घेता येते. निम्यलस, वॉलनट, रॉकरोज अशी औषधे वापरता येतात.

सुलभ प्रसूती होण्यासाठी सातव्या महिन्यापासून घेण्याचा होमिओपॅथीक औषधांचा एक फॉर्म्युला आहे. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते.

मुदत उलटून गेली तरी काही स्त्रियांना कळाच येत नाहीत. अशांना कॉलोफायलम, सिकेलकॉर, पल्सेटिला अशी औषधं देऊन कळा आणता येतात. काही स्त्रियांना प्रथमतः कळा येतात. परंतु नंतर बंद होतात. अशावेळीही कॉलोफायलम हे औषध उपयोगी पडते.

प्रसूतीपश्‍चात सर्व जखमा भरून येण्यासाठी, अंगदुखी कमी करण्यासाठी अर्निका हे औषध वापरता येते.

प्रसूतीपश्‍चात रक्तस्राव अजिबात थांबत नसेल तर हॅमेमॅलीस, युस्टिलॅगो अशा औषधांनी इच्छित परिणाम साधता येतो.

प्रसूतीपश्‍चात ताप आल्यास, अंगात कळा येत असल्यास रसटॉक्स हे औषध उपयुक्त आहे. होमिओपॅथीक उपचार वाचून किंवा स्वतःच्या मनाने करू नयेत. तज्ज्ञज्ञंच्या सल्ल्यानुसार औषध घेतल्याने व्यवस्थित शक्तीचे व प्रमाणात औषध दिले जाऊन अनिष्ट परिणाम टाळता येतो.

योगोपचार

प्रसूतीच्या वेळी मन व शरीर शिथिल असणे आवश्यक आहे. त्यासाठी रिलॅक्सेशन टेक्निक शिकून घेतले पाहिजे. श्‍वासनियमन करणे, कळा देणे यांचे प्रशिक्षणसुध्दा आधुनिक मातांसाठी आवश्यक ठरले आहे. त्यासाठी काही सोपे व्यायाम प्रकार, प्राणायाम यांची मदत घेता येते.

संपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक – ९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.