एकच झाड लावा खर ते जगवण्यासाठी प्रयत्न करा हा उदेश्य आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पुढे करत बेळगावात ‘ग्रीन ग्लोबल इंडिया’ही संस्था बेळगावात काम करत आली आहे. गेल्या तीन वर्षात त्यांनी अडीच हजार झाडे लावली आहेत मात्र केवळ झाडे लावून गप्प न बसता त्यांनी लावलेल्या झाडांपैकी दोन हजार हून अधिक झाडे जगवली आहेत.
गेल्या चार वर्षात शाळा कॉलेजच्या पठांगण,स्मशानभूमीत अश्या मोकळ्या अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत केवळ झाडे लावून गप्प बसत नसून झाडे जगण्यासाठी प्रयत्न केले आहेत ज्या ठिकाणी झाडे लावली आहेत त्या ठिकाणी जर का पाणी नसेल तर पाण्याची देखील सोय या संस्थेच्या माध्यमातून केली जाते. उदाहरणार्थ पिरनवाडी स्मशानभूमीत झाडे लावली आहेत मात्र त्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती झाडे जागवण्यात पाण्याची टाकी बसवून पाण्याची देखील सोय केली आहे झाडे जगवली आहेत.
ग्रीन ग्लोबल इंडिया या संस्थेला केंद्र सरकारची मदत होत असते यात अनेक खासदार आमदार महनीय लोक आहेत या प्रोजेक्ट द्वारे बेळगाव ग्रीन करणेहा आमचा दआमचा उद्देश्य आहे.या माध्यमातून आम्ही खेडे गावात पोहोचलो आहोत गेल्या तीन वर्षात जवळपास आम्ही पिरनवाडी सांबरा वाघवडे मच्छे देसुर राकसकोप बीजगरणी,अनगोळ,कर्ले आदी भागात लावली असून लावलेली झाडे जगवली आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सचिन गोरले यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली .
आता पर्यंत तीन वर्षात अडीच हजार झाडे लावली आहेत त्यापैकी शाळेतील पाठांगण मध्ये लावलेली झाडांची जागवण्याची जबाबदारी शाळेतील दिली होती, त्या झाडा व्यतिरिक्त सगळी झाडे आम्ही जगवली आहेत. अध्यक्ष सचिन गोरले,उपाध्यक्ष अनिल भोईटे,कार्याध्यक्ष मुकेश पुरोहित,तालुका प्रमुख सचिन राऊत, खजिनदार यल्लापा पाटील,संचालिका गीता बस्तवाडकर,बन्सी गुरव,सुनील मोहिते,पिराजी शिंदे,प्रमोद मुचंडीकर या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण बचावो साठी कार्यरत आहेत.
याच वर्षी पाच हजारांचे उद्दिष्ट बाळगले आहे बेळगाव सह खानापूर तालुक्यात झाडे लावणार आहोत अनेक शाळातून,येळ्ळूर राजहंसगड,नंदीहळळी,देसुर,धामणे हट्टी सह पूर्व भागात झाडे लावण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.