वडगांव मलप्रभा नगर येथून मंगळवार दुपार पासून बेपत्ता झालेला सात वर्षीय युवक गणेश होसमनी हा अद्याप बेपत्ताच आहे.
रयत गल्ली पोटे मळा येथील पडक्या विहीरीत पडला असावा या संशयाने बुधवारी दुपार पासून विहिरीतील पाणी गाळ काढून शोध मोहीम राबविण्यात आली होती बुधवारी रात्री बारा वाजे पर्यंत विहिरीतील पाणी आणि गाळ काढण्यात आला मात्र त्या विहिरीत काहीच आढळलं नाही.
पडक्या विहिरीत मोहीम संपल्यावर बेपत्ता झालेल्या गणेशचा शोध घेण्याचा प्रयत्न शहापूर पोलिसांनी चालू केला आहे.
मंगळवारच्या दिवशीच बेपत्ता झालेल्या गणेशचा वाढदिवस होता त्याच अपहरण झालंय का?बेपत्ता होण्या मागचं मूळ कारण आणखी काय याचा तपास पोलीस करत आहेत.