मलप्रभा नगर वडगाव येथील राहणाऱ्या सात वर्षीय मुलाचा शोध रयत गल्ली येथील पोटे मळ्यातील पडक्या विहिरीत घेतला जात आहे.गणेश मंजुनाथ होसमनी (वय ७) हा मंगळवार दुपारी पासून गायब आहे खेळायला जातो म्हणून सांगून तो घरातून बाहेर पडला होता तो परतलाच नव्हता म्हणून पालकांनी शोध घ्यायला सुरु केली आहे.
रयत गल्ली येथील पोटे मळ्यातील पडक्या विहिरीकडे तो गेला असावा विहिरीच्य बाजूनी इलायची चिंचांची झाडे आहेत चिंचा काढायला गेला असावा आणि पाय घसरून विहिरीत पडला असावा असा संशय या भागातील लोकांनी व्यक्त केला होता त्यामुळे गायब गणेशचा शोध त्या पडक्या विहिरीत घेतला जात आहे.पोटे मळ्या जवळील एका सी सी टी व्ही फुटेज मध्ये गायब झालेला मुलगा त्या दिशेने गेल्याचे दिसल्याने त्याची विहिरीत पडायची शक्यता आहे.
बुधवारी सायंकाळी उपमहापौर मधुश्री पुजारी भेट देऊन पाहणी केली,तर माजी महापौर अप्पासाहेब पुजारी शहापूर पोलीस निरीक्षक आणि अग्नी शामक दलाचे दोन प्रतिनिधी यांनी त्या विहिरीतील गाळ आणि पाणी काढायला सुरुवात करून शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पडकी विहीर ३० फुट खोल असून जर का या विहिरीत पडला असेल तर गाळ झाड झुडुपे मोठ्या प्रमाणात आहेत ती पूर्णपणे काढल्या शिवाय चिमुकल्या गणेशची शोध लागणे कठीण आहे. बुधवारी सायंकाळी पर्यंत मोठी मोटार आणून गाळ पाणी काढून शोध चालूच होता.
या घटनने बोरवेल पडक्या विहीरिचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पडक्या विहिरीत चाललेल्या शोध मोहिमेची चर्चा वडगाव भागात होत असून शहरातील अश्या पडक्या विहिरी बुजवा अशी मागणी केली जात आहे.