फेस बुक च्या माध्यमातून प्रेम करतो असे भासवून फसवणूक करणाऱ्या महिलेस पोलिस स्थानकाची हवा खावी लागली आहे.
बेळगाव पोलीस अधीक्षक कार्यालया जवळ सदर महिलेस लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.संकेश्वर येथील रूपा पाटील वय 37 असे महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी समजलेल्या अधिक माहिती नुसार हुक्केरी येथील संतोष नावाच्या युवकास फसवल्याचा आरोप त्या महिलेवर ठेवण्यात आला आहे.सुमा आणि सुषमा अश्या वेगवेगळ्या नावाच्या फेस बुक अकाउंट मधून संतोष सह अनेकांची चॅटिंग द्वारा ओळख करून घेऊन फोन द्वारे पैश्याची मागणी करत लाखो रुपये उकळले आहेत असा देखील आरोप केला जात आहे.
फेसबुक प्रेमात फसून संतोष याने चार लाख रुपये उडवले आहेत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यानं मार्केट पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. महिलेची मार्केट पोलिसांनी कसून चौकशी केली असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.सदर प्रकरण हुक्केरी पोलीस स्थानकात स्थलांतर करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.