विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवा नंतर युवा कार्यकर्त्यांची बैठक महागणपती मंदिर, नाथ पै चौक शहापूर येथे पार पडली.प्रथम श्रीकांत कदम यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, आणि ‘पाईक’ म्हणून एकीचे प्रयत्न करताना अपयशी ठरलो याबाबत समस्त सीमावासीयांची दिलगिरी व्यक्त केली.
समितीचा पराभव हा समस्त सिमवासीयांच्या जिव्हारी लागला आहे आणि बेकी सुद्धा काहीअंशी या पराभवाला कारणीभूत आहे पण त्यासोबतच समितीचा युवकांशी तुटलेला संपर्क आणि राष्ट्रीय पक्ष्याची प्रलोभने हा ही मुद्दा पराभवाची कारणमीमांसा करताना मांडण्यात आली. समितीच्या ध्येयधोरणाशी आणि समितीशी एकनिष्ठ राहून युवकांना एकत्र समितीच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि सिमा प्रश्नांच्या लढ्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी *एक युवा संघटन* बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि तो प्रस्ताव सर्वसंमतीने पास करण्यात आला. निवडणुकीत झालेल्या पराभवा नंतर देखील दोन्ही समित्या एकत्र आल्या नाहीत त्यामुळं युवा समिती कोणत्याही गटांशी बांधील नाही ही तिसरी समिती नसून सीमा लढ्यात एक खारीचा वाटा योगदान देईल असेही ठरवण्यात आले.
*महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ “युवा समिती”* या नावाने स्थापन करण्याचे ठरविण्यात आले.तसेच या सदर्भात येत्या रविवारी एक व्यापक बैठक घेऊन पुढील वाटचालीवर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.या प्राथमिक बैठकीला सुरज मजुकर, श्रीकांत कदम, राहुल हुलजी, निर्मल धाडवे, शुभम शेळके, अंकुश केसरकर, राकेश सावंत, सुरज कुडुचकर, सचिन केळवेकर, कुणाल पाटील, किरण हुद्दार, विनायक कावळे, दीपक देसाई, अभिजित मजुकर, वासू सामजी, श्रीधर खन्नूकर, संदीप पाटील, नितीन केळवेकर, दीपक सावळेकर, मंगेश बाळेकुंद्री, चंद्रकांत पाटील, माणिक पाटील, सुरज मजुकर, महेश जाधव, बळवंत पाटील, भावेश बिर्जे, संतोष कृष्णाचे,अभय चव्हाण आणि साईनाथ शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त केलं.