निपाहाचा विळखा दिवसेंदिवस आवळत चालला आहे त्यामुळे याची धास्ती आता साऱ्यांनीच घेतली आहे यासाठी आरोग्य मंत्रालयाने हेल्पलाइन सुरू केली आहे या हेल्पलाईन वर बेळगाव मधील 15 जणांनी विचारपूस केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
केरळमध्ये या रोगाने सध्या धुमाकूळ घातला आहे, हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे याची सर्वच ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन सम्बधित आरोग्य खात्याने केले आहेत.दरम्यान निपाह बाबत सर्वाना माहिती मिळावी यासाठी आरोग्य मंत्रालयाने 104 हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.
राज्य भरातून या हेल्पलाइन वर फोन करण्यात आले असून बेळगाव मधूनही 15 जणांनी निपाह बाबत विचारपूस केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.