Monday, December 30, 2024

/

निवडणुकात ए व्ही एम वापर नको- समितीचे निवेदन

 belgaum

देश भरात ए व्ही एम मशीन बाबत विरोधी पक्षा कडून सर्वत्र विरोध होत असताना बेळगावातील  एकीकरण समितीने देखील निवडणुकात ए व्ही एम मशीन बाबत आक्षेप नोंदवला आहे. निवडणुकात ए व्ही एम बाबत संशय व्यक्त करत यापुढील निवडणुकात ए व्ही एम मशीन वापर थांबवा अशी मागणी समिती नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्या द्वारा करण्यात आली आहे.

mes oppose avm

कालच महाराष्ट्रातील पालघर भंडारा आणि उत्तर प्रदेश मधील ए व्ही एम मशीन निवडणुकी दिवशी मतदाना दरम्यान बंद पडल्या होत्या पालघर लोकसभा मतदार संघात तर ऐतिहासिक असे रात्री दोन वाजे पर्यंत मतदान चालले होते ए व्ही एम मशीन मधला बिघाड तांत्रिक दोष यामुळे ए व्ही एम बाबत संशय व्यक्त केला जात आहे.आगामी निवडणुकात ए व्ही एम वापर नको अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी टी के पाटील, किरण गावडे,नेताजी जाधव, बाळासाहेब काकतकर,रेणू किल्लेकर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.