सहकार चळवळ अखंडितपणे पारदर्शकता मुळे चालवायची असेल तर सहकार आणि आयकर खात्याने समन्वय साधून लोकहिताचे कायदे अमलात आणणे जरुरीचे आहे. सहकार खात्याने अनेक निर्बन्ध लादल्याने सहकार चळवळच धोक्यात आली आहे असे मत श्रीमाता संस्थेचे अध्यक्ष मनोहर देसाई यांनी दिली. मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
यंदा श्रीसंस्थेला २ कोटी ५५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना दहा टक्के लाभांश देणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केल.
नोटबंदी आणि जी एस टी मुळे अर्थ व्यवस्था ढासळली होती भागीदारांचे सहकार्य ठेवीदार आणि ग्राहकांच्या विश्वासा मुळेच संस्थेने ही प्रगती साधली आहे पैश्याची उधळपट्टी अकारण जाहिरात बाजी आम्ही नेहमीच टाळत आलोय त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत देखील श्रीमाता संस्था भक्कमपणे उभी आहे असे देखील ते म्हणाले.