कपिलेश्वर मंदिरात सेवा म्हणून मंदिर धुण्यास आलेल्या तरुणावर ऍसिड फेक प्रकरणी एकूण चौघांना अटक केली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकाने ही कारवाई केली आहे.
रामा गोपाळ पुजारी, महादेवी गोपाळ पुजारी, लता अनिल डवरी, गीता गजानन भोसले या चार जणांना अटक केली आहे. कलम ३२६ ए, ५०६, ३४१, ३४, ३०७ व ३२३ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना न्यालायालात हजर करण्यात आले आले होते
सोमवारी रात्री प्रथमेश नागेंद्र कावळे ( वय २४) या भवानी नगर च्या सेवेकरी युवकावर ऍसिड फेकण्यात आले होते. पुजाऱ्यांचे एक प्रकरण उघडकीला आले म्हणून त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याने सेवा करणाऱ्या युवकाला लक्ष्य करून हा डाव साधण्यात आला आहे.
प्रथमेश हा दर सोमवारी मंदिरात जाऊन पूजा व मंदिर स्वच्छता करतो. काल ही तो हेच काम करत होता, हल्ला झाल्याने त्याला भाजले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान कपिलेश्वर मंदिर परिसरातील संतप्त लोकांनी पुजाऱ्याला मारहाण करून त्याची अर्ध नंग्न धिंड काढल्याचा व्हिडियो देखील सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.