सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता, कचऱ्याची घाण लक्षात घेऊन या पुढील दोन महिने स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व नेहरू युवा केंद्र तसेच विविध संघांनी घेतला आहे.
एकूण १०० हुन अधिक तास काम करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे, नदी, नाले, विहिरी, शाळा व सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. १ जून ते ३० जुलै पर्यंत ही मोहीम चालणार आहे.
यामध्ये सहभागी होणाऱ्याना बक्षिसेही देण्यात येणार आहेत, अनुक्रमे ३०, २० व १०हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तरी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.