सेना, सेनाधिकारी, सेनाप्रमुख यांचे काम देश संरक्षणाचे.ते काम आपला जीव धोक्यात घालून ते करीतच असतात. पण देश घडवण्याच्या कामातही जर सेना किंवा सेनाधिकाऱ्यांनी योगदान दिले तर अतिउत्कृष्ठ कामाची प्रचिती येऊन जाते. असेच काम बेळगावच्या मराठा सेंटरचे ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. अरगन तलावाचे पुनरुज्जीवन करून भर उन्हातही या तलावात पाणी राखून ठेवण्याचे हे काम त्यांनी केले आहे. यामुळेच बेळगावच्या जनतेकडून आणि बेळगाव live कडून मराठा सेंटर आणि ब्रिगेडियर कलवाड यांना हॅट्स ऑफ…..
अरगन तलाव बेळगाव शहरात अतिशय जुना तलाव आहे. हिंडलगा गणपती मंदिरच्या शेजारील हा तलाव मराठा सेंटर च्या ताब्यात आहे. या तलावाचा वापर नागरिक पूजेचे साहित्य फेकण्यासाठी अनेक दशके करीत आले आहेत. हे साहित्य आणि जमणारा गाळ कुजून हा तलाव भरला होता. ब्रिटिश काळापासून आजपर्यंत हा गाळ कुणीच काढला नव्हता, यामुळे पाणी टिकण्यास जागाच नव्हती व उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच तलाव सुकून जात होता.
मराठा सेंटर चे कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांच्या निदर्शनात ही गोष्ट आली, त्यांनी हा तलाव गाळ उपसून मोकळा करण्याची मोहीम हाती घेतली, अन एक दोन महिन्यात शेकडो सैनिक, काही माजी सैनिक दिवसरात्र राबून हा तलाव खुला करू शकले आहेत. राबणारे हात आणि जेसीबी सारख्या यंत्रांची साथ घेऊन कलवाड यांनी एक आदर्श घालून दिला आहे. हे काम मराठा सेंटरने पूर्णपणे आपल्या जीवावर केले आहे.
बेळगाव live च्या माध्यमातून अरगन तलावातल्या गाळाची सुपीक माती मोफत जनतेने घेऊन जावे असे आवाहन देखील त्यांनी केले होते त्याला प्रतिसाद मिळाला नाही यातून जनतेला मदत होईल याची तळमळ देखील त्यांच्यातून दिसली या इतिहासिक सात तलावांच पुनरुज्जीवन करत पर्यटन स्थळा प्रमाणे विकास करून टाकला आहे.सैनिक हे जीवनच आदर्श देणारे आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करतानाच आणखी सुधारणा होतील अशी आशा बाळगुया आणि यापुढे हा तलाव आमच्या चुकीने घाण होणार नाही यासाठी प्रयत्न करूया.
The great Maratha Light Infantry… All Ranks n civilian ‘s hats off.. Jai Hind..