मागील अनेक बैठकिमध्ये मराठी कागदपत्रे देण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.मात्र आता येणाऱ्या बैठकीत मराठीतून कागदपत्रे देण्यात आली नाहीत तर मराठी सदस्य आक्रमक होणार आहेत.महत्वाचे म्हणजे नामावलीचा फलकही कन्नडमध्येच लावण्यात आल्याने येथील अधिकाऱ्यांना मराठीबद्दल किती वावडे आहे हे दिसून येते.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोफा थंडावला आहेत.त्यामुळे सर्वच कार्यालयात गजबज सुरू आहे.मागील बैठकीत लवकरच मराठी नामावलीचा फलक लावण्यात येईल असे सांगण्यात आले होते.मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचेच दिसून येत आहे.
तालुका पंचायतमध्ये अध्यक्षानि याबाबत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा मराठी सदस्य आंदोलनाच्या पवित्र्यात असणार आहेत.त्यामुळे लवकरात लवकर येथे मराठीतील नामावेळी लावावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तेथील अधिकारी मात्र या मागणीकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. सत्ताधारी पक्षात असणाऱ्या नूतन ग्रामीण आणि खानापूरच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि अंजली निंबाळकर या दोघीनीही मराठीचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले आहे त्यामुळं त्यांच्या कडून मराठी बाबत सरकार दरबारी अपेक्षा वाढल्या आहेत.