मागील १५ दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांतून तिखट प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. वारंवार होणारी दर वाढ नागरिकांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.दररोज २० ते ३० पैशांनी वाढ होत आहे.ही दरवाढ दररोज होत असल्याने नागरिकांना ते कळत नसल्याचे दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर या दरवाढीबाबत अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महत्वाचे म्हणजे याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही होत असल्याचे दिसून येत आहे.मागील १५ दिवसांत पेट्रोल दर ३.५० रुपये तर डिझेल दर ३.४० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे पहिलाच महागाई आणि त्यात हे दर वाढल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.